जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष रमेश डोंगर शिंदे यांच्या मातोश्री श्रीमती गीताबाई डोंगर शिंदे यांचे आज वृध्दापकाळाने निधन झाले.
कुसुंबा ता.जि.धुळे येथील श्रीमती गीताबाई डोंगर शिंदे (वय वर्षे ९५) ह्यांचे आज संध्याकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलं, तीन मुली व नातवंडे असा परिवार आहे. श्री गुरुदत्त माध्यमिक विद्यालय, वायपूर (धुळे) येथील माध्यमिक शिक्षक दिलीप डोंगर शिंदे, महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष रमेश डोंगर शिंदे व एस टी डेपो धुळेचे आर्टिस्ट सुभाष डोंगर शिंदे ह्यांच्या त्या मातोश्री होत. त्यांची अंत्ययात्रा उद्या दुपारी दोन वाजता स्वोजस, २२,आदर्श कॉलनी, इंदिरा उद्यानाजवळून, देवपूर, धुळे येथून दुपारी दोन वाजता निघेल. एकविरा मंदिराजवळील वैकुंठधाम, (देवपूर ) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.