Home Cities पाचोरा पाचोरा येथे नंदू शेलार युवा मंचतर्फे वृक्षारोपण

पाचोरा येथे नंदू शेलार युवा मंचतर्फे वृक्षारोपण


pachora plantation

पाचोरा, प्रतिनिधी | येथील ठाकरे नगरातील गजानन महाराज मंदिर परिसरात नंदू शेलार युवामंचच्या माध्यमातून नुकतीच विविध वृक्षांची लागवड करण्यात आली.

 

याप्रसंगी प्रमुख पाहुणे प्रा. संदीप पवार उपस्थित होते. यावेळी “झाडे लावा झाडे जगवा “या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत वड, पिंपळ, जांभूळ, गुलमोहोर आदी विविध जातींच्या वृक्षांची लागवङ करण्यात आली. यावेळी नंदू शेलार युवा मंचचे अध्यक्ष नंदू शेलार, सोपान पाटील, अमोल सावंत, बंटी गोसावी, ज्ञानेश्वर पाटील, राहुल पाटील, दिनेश पाटील, बंटी पाटील, गिरीश पाटील, रोहित प्रजापत, आशीष पाटील, ज्ञानेश्वर लोनारे, मुकेश राठोड, किरण राठोड, गोलू सावंत, रितेश खैरनार, प्रसाद महाराज, दीपक बुरखा, बंटी चव्हाण आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound