भुसावळ, प्रतिनिधी | तालुक्यातील हतनुर धरणाचे २४ दरवाजे उघडण्यात आले आहे. धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे व मध्यप्रदेश व विदर्भातून धरणात पाण्याची आवक वाढल्याने धरणाचे २४ दरवाजे उघडण्यात आले आहे.
या धरणातून १ लाख ३० हजार ९४७ क्युसेक्स वेगाने तापी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे तापी नदीला पूर आला असून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.