Home Cities चोपडा गलगी येथे दहीहंडी उत्साहात

गलगी येथे दहीहंडी उत्साहात

0
33


gilagi

चोपडा प्रतिनिधी । येथील सरदार वल्लभभाई पटेल सेवाभावी शैक्षणिक संस्था संचलित श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल गलगीमध्ये आज दि. 24 ऑगस्ट रोजी सालाबादप्रमाणे दहीहंडी उत्साहात साजरी करण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, या वेळेस विद्यार्थी मित्रांनी घरुन श्रीकृष्णाच्या व राधेच्या तसेच गोपी गोपिकांचा पोशाख परिधान करून आणले होते. विविध प्रकारच्या दांडिया खेळ खेळून विद्यार्थींनी आनंद घेत दहीहंडी फोडली. यावेळेस संस्थेचे अध्यक्ष कांतीलाल पाटील यांनी विद्यार्थ्यांना श्रीकृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व सांगितले. तसेच संस्थेचे सचिव स्नेहलता पाटील यांनी मुलांना मार्गदर्शन करत दहीहंडीत का फोडण्यात येते याचे महत्त्व सांगितले व परमेश्वराचे स्मरण करत बाळगोपाळांना श्रीकृष्ण भगवंतांच्या बाललीला सांगितल्या. ‘गोविंदा आला रे आला’ असा जयघोष करून विद्यार्थी व शिक्षक वृंद यांनी दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा केला.
शेवटी सर्वांना प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


Protected Content

Play sound