जळगाव प्रतिनिधी । संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमिवर, फेब्रुवारी महिन्यापासून शहरात तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिली.
यंदा पावसाळा कमी झाला असून शहराला पाणी पुरवठा करणार्या वाघूर धरणातील पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट होत आहे. यामुळे शहराचा पाणी प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमिवर, पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार असून फेब्रुवारी महिन्यापासून अंमलबजावणी करणार असल्याची माहिती दिली. दरम्यान, सुप्रीम कॉलनीला एमआयडीसीकडून पुरवठा करण्याबाबत एमआयडीसीला पालिकेने पत्र दिले असल्याचेही त्यांनी सांगितले. जर एमआयडीसीने पाणीपुरवठा केला तर जळगावकरांनी तीन दिवसाऐवजी दोन दिवसाआड पाणीपुरवठा होऊ शकतो असेही त्यांनी सांगितले.