चोपडा, प्रतिनिधी | येथील विख्यात आणि शतकपूर्ती प्राप्त प्रताप विद्या मंदिरातील विद्यार्थीप्रिय निवृत्त शिक्षक, पर्यवेक्षक रमणलाल कन्हैयालाल भारती (वय ९०) यांचे काल (दि.२०) दुपारी ३.०० च्या सुमारास वृद्धाकाळाने निधन झाले. आज (दि.२१) सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
विश्व हिंदू परिषदेच्या रामशिला आंदोलनात ते सक्रिय होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे. प्रविममधील संगीत शिक्षिका, संगीत विशारद विमलागौरी भारती यांचे ते पती, चोपडा पीपल्स बँकेतील रोखपाल सच्चिदानंद, वल्लभ व सौ.प्रतिभा नरेश गुजराथी (बडोदा) यांचे ते वडील होते.