लातूर प्रतिनिधी । येथील विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान व संशोधन केंद्राचे डॉ. अशोक कुकडे यांना केंद्र सरकारचा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा झाली. यात लातूर येथील विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान व संशोधन केंद्राचे डॉ. अशोक कुकडे यांना केंद्र सरकारचा पद्मभूषण पुरस्कार घोषीत करण्यात आला आहे. मूळचे पुणे येथील डॉ. अशोक कुकडे यांनी यांचे वैद्यकीय शिक्षण बीजे मेडिकल कॉलेज येथे झाले. ते एमबीबीएसला सुवर्णपदक विजेते होते. अन् एमएसमध्येही सर्वप्रथम आले होते. १९६४ साली डॉ. कुकडे लातूरला आले. काही काळ खाजगी सेवा दिल्यानंतर ट्रस्ट हॉस्पिटल उभे केले. ज्याचा विस्तार विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान व संशोधन केंद्र असा झाला आहे. डॉ. अशोक कुकडे यांनी भारतीय शिक्षण प्रसारक मंडळ, जनकल्याण समिती या शिक्षण संस्थांचेही अध्यक्षपद भूषविले आहे.