माहिती तंत्रज्ञानाचे प्रणेते स्व.राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन

WhatsApp Image 2019 08 20 at 3.33.51 PM

 

धरणगाव (प्रतिनिधी) येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुल येथे देशाचे माजी प्रधानमंत्री व माहिती तंत्रज्ञानाचे प्रणेते स्व. राजीव गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली.

 

यावेळी सर्वप्रथम शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे व शाखा व्यवस्थापक जगन गावित यांनी राजीवजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले.त्यानंतर शाळेच्या शिक्षिका शिरीन खाटीक यांनी राजीव गांधींच्या बद्दल माहिती दिली. देशात संगणक प्रणाली व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात राजीव गांधी यांचे भरीव योगदान आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांना वैधानिक दर्जा देण्यात यावा यासाठी सर्वप्रथम राजीवजींच्या कार्यकाळात विधेयक मांडले गेले होते.राजीव गांधींच्या कार्यकाळात भारताची विकासाची गती अतिशय उत्तम होती.देशासाठी आणि देशाच्या विकासासाठी प्रयत्न करणारे एक उत्तम प्रधानमंत्री अशी त्यांची ओळख होती. विद्यार्थ्यांना उद्देशून खाटीक मॅडम म्हणाल्या की , तुमच्या मधून देखील उद्याचे राजीव गांधी तयार होऊ शकतात आणि ते ज्या दिवशी होईल तीच खऱ्या अर्थाने राजीवजींना आदरांजली ठरेल.कार्यक्रमाला शाळेच्या प्राचार्या , शाखा व्यवस्थापक , शिक्षकवृंद , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी – विद्यार्थीनी उपस्थित होते.

Protected Content