
जम्मू-काश्मीर (वृत्तसंस्था) दगडफेकीच्या घटना आणि इंटरनेट सेवा बहाल केल्यानंतर खोटया बातम्या पसरत असल्यामुळे प्रशासनाने काश्मीर खोऱ्यात पुन्हा एकदा निर्बंध लागू केले आहेत.
काश्मीरमध्ये जनजीवन पूर्ववत करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल म्हणून ३५ पोलीस स्टेशनच्या हद्दीत निर्बंध शिथिल करण्यात आले होते. परंतु २४ तासांच्या आतच गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. श्रीनगरमध्ये दुकाने आणि अन्य व्यावसायिक कार्यालये शनिवारीही बंद होती. श्रीनगरमधल्या काही भागांमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांवर दगडफेकीच्या घटना घडल्या. काही युवक बाईकवरुन फिरुन कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात दुकाने उघडू नका असे व्यापाऱ्यांना आव्हान करत फिरत होते.