Home धर्म-समाज भुसावळात डॉक्टर दाम्पत्याचा स्वातंत्र्यदिनी अनोखा उपक्रम

भुसावळात डॉक्टर दाम्पत्याचा स्वातंत्र्यदिनी अनोखा उपक्रम


doctor upkram

भुसावळ, प्रतिनिधी | येथील डॉ.मानवतकर दाम्पत्याने अनोखा उपक्रम राबवून रुग्णांसोबत स्वातंत्र्यदिन साजरा करून राष्ट्रप्रेमाचा एक अनोखा संदेश दिला आहे.

 

मानवतकर रुग्णालयाचे डॉ.राजेश मानवतकर व डॉ.मधू मानवतकर हे दांपत्य दरवर्षी विविध उपक्रम तालुक्यात राबवित असतात. यंदा त्यांनी आपल्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसोबत स्वातंत्र्यदिन साजरा करून सर्व रुग्णांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत केली. सकाळपासून रुग्णालयात बसलेल्या रुग्णांना त्यांनी आपल्या हाताने स्वातंत्र्य दिनाचे बॅच लावून व मिठाई खाऊ घालून आनंद साजरा केला. पंतप्रधान मोदी यांनी जम्मू-काश्मीर मधून कलम ३७० रद्द केल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले.


Protected Content

Play sound