रावेर (प्रतिनिधी) गरीब जनतेचा रेशनचा माल अवैधरीत्या साठवून ठेवल्या प्रकरणी दि 15 ऑगस्ट रोजी रावेर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. संबधित आरोपीच्या शोधात पोलिसांनी चांगलीच कंबर कसली असून जो पर्यंत आरोपी मिळत नाही. तोपर्यंत यात कोण-कोणाचा सहभाग आहे, हे कळणार नाही. त्यामुळे संशयितांना पकडण्यासाठी वेग-वेगळ्या दिशेने पथके पाठवील्याची माहिती तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक अमितसिंग देवरे यांनी दिली आहे.
महसूल विभागाकडून रावेर तालुक्यातील 22 रेशन दुकानांची चौकशी सुरु झाली आहे. रावेर-यावल तालुक्यात अनेक वर्षापासून सुरु असलेले रेशन रॅकेटच्या मूळापर्यंत पोहचण्याचे आव्हान पोलिस व महसूल विभागासमोर समोर उभे राहिले आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांच्या धडक कारवाई नंतर हे संपूर्ण प्रकरण बाहेर आले आहे. याबद्दल दोन्ही तालुक्यात खूपच चर्चा आहे. आतापर्यंत संपूर्ण मालाची किमंत 38 लाख 60 हजार 300 रुपयापर्यंत पोहचली आहे. तर दुसरीकडे दिवसभर विभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे,पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे,तपास अधिकारी अमितसिंग देवरे,पुरवठा अधिकारी हर्षल पाटील यांनी संबधित गोडाऊन येथे जाऊन पंचनामे करून पाहणी केली. तर येथे असलेला गहू ,तांदूळ साखर हा येथून शासकीय गोडाऊनमध्ये हलविण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून तहसीलदार यांना पत्र देण्यात आले आहे.