Home Cities एरंडोल महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविली

महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविली

0
20

एरंडोल प्रतिनिधी । येथील बसस्टँड वरून एक महिला बस मध्ये चढत असतांना अज्ञात चोरट्याने तिच्या गळ्यातील तीन तोळे सोन्याची पोत लंपास केल्याची घटना घडली आहे.

याबाबत एरंडोल पोलीस सुत्रांनुसार मिळालेली माहिती अशी की १६ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता निशा राजेंद्र कोळी (राहणार मंगरूळ ता.चोपडा) या एरंडोल बसस्थानकावर बस मध्ये चढत असतांना त्यांची तीन तोळे वजनाची सुमारे १ लाख २७ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने चोरल्याने एरंडोल पोलीस स्टेशनला त्या अज्ञात चोरट्या विरोधात निशा कोळी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनिल लोहार पुढील तपास करीत आहेत.


Protected Content

Play sound