Home Cities चोपडा विरवाडे येथे सेवानिवृत्त मेजरच्या हस्ते ध्वजारोहण

विरवाडे येथे सेवानिवृत्त मेजरच्या हस्ते ध्वजारोहण

0
114

virvade

चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील विरवाडे येथील जि.प. प्राथमिक डिजीटल मॉडेल शाळेत सेवानिवृत्त मेजर संग्राम कोळी यांच्याहस्ते दि. 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले.

याबाबत माहिती अशी की, शाळेच्या वाद्यवृंद गटाने राष्ट्रगीत व झंडागीत गाऊन राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संग्राम कोळी सेवानिवृत्त मेजर व पीएसआय भायखळा पो. स्टेशन शशिकांत सैंदाणे होते. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार शाल, गुलाबपुष्प देवून करण्यात आले. संग्राम कोळी यांचा सत्कार शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष प्रशांत माळके व शशिकांत सैंदाणे यांचा सत्कार माजी जि.प.सदस्य धमेंद्र राजपूत यांनी केला. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रमेश कोळी, अकबर तडवी, भरत शिरसाठ, अनिकेत पाटील, तुषार इखे, अनिता पाटील, मनिषा पाटील, संगिता भालेराव यांनी अथक परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound