जळगावातून वृद्ध बेपत्ता

bepatta

जळगाव प्रतिनिधी । शहरातील जोशीपेठ येथील 55 वर्षीय प्रौढ घरात काहीही न सांगता निघून गेल्या प्रकरणी शनीपेठ पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक तोताराम मराठे (वय-55) जोशी पेठ येथे राहत असून, हे 15 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता बाहेरून फिरून येतो असे सांगून घराबाहेर पडले. मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी न आल्याने शोधाशोध सुरू झाली. ते न मिळाल्याने त्यांची मुलगी वंदना अशोक मराठे यांच्या खबरी वरून शनिपेठ पोलिसात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास संदीप पाटील करीत आहे

Protected Content