Home क्राईम चौघांनी चढवला एकावर धारदार शस्त्राने हल्ला

चौघांनी चढवला एकावर धारदार शस्त्राने हल्ला

0
20

ींससं

जळगाव प्रतिनिधी | येथील कोळीवाडात मागील भांडणाच्या कारणावरून एकाला चौघांनी मारहाण करून धारदार शस्त्राने वार करत जखमी केल्याची घटना दि. 15 ऑगस्ट रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत शनिपेठ पोलीसात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, महेंद्र तुकाराम सोनवणे (वय 37) रा. बालाजी मंदिराच्या मागे कोळीवाडा जळगाव हा रात्री 10.30 वाजता कामावरून घरी आल्यानंतर जेवण करत असतांना संशयित आरोपी आकाश उर्फ सोनू सुरेश सपकाळे, सागर उर्फ झापर्या सपकाळे, गौरव भारत कुवर आणि सोनार (पुर्ण नाव माहीत नाही) सर्व कोळीवाडात राहत असून यांनी घरात घुसून अचानक मारहाण करण्यास सुरुवात केली. एकाने चाकू काढून कंबरेच्या डाव्या बाजूला मारून जखमी केले. तसेच संशयित आरोपी आकाश व सागर यांनी महेंद्रच्या डोक्यावर बंदूक ताणून जीवे ठार मारण्याची धमकी देखील दिली. याबाबत शनिपेठ पोलिसात महेंद्र सोनवणे यांच्या फिर्यादीवरून चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे करीत आहेत.


Protected Content

Play sound