रावेर प्रतिनिधी । गरीब जनतेसाठी शासनामार्फत पाठविलेला रेशनचा धान्यसाठा अवैध पध्दतीने काळा बाजार करण्यासाठी साठवून ठेवलेला गोडाऊनवर जिल्हा पुरवठा विभागाच्या टीमने छापा टाकला. या छाप्या मधुन सुमारे 28 लाख 10 हजार 300 रुपये किमतेचा गहू मका साखर तांदूळ जप्त करण्यात आला आहे. अवैध रेशनच्या धान्यसाठयावर जिल्हा भरातील सर्वात मोठी कारवाई रावेरमध्ये झाली आहे. यामुळे रेशन माफियांचे रॅकेट रावेरात किती सक्रीय आहे. याचा अंदाज या कारवाई वरुन येतो याबाबत रावेर पोलिस स्टेशनला दोन जणां विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१४ ऑगस्ट रोजी सायंकाळी जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी आपल्या टीमसह रावेरमध्ये दाखल झाले व येथील स्थानिक तसिलदार उषारानी देवगुणे, पुरवठा निरीक्षक के.आर.तडवी, मंडळाधिकारी सचिन पाटील तलाठी निलेश चौधरी, विजय शिरसाड या टीमने सायंकाळी पं.स. सदस्य योगेश पाटील यांच्या खाजगी गोडाऊन अचानक छाप टाकला. यामध्ये यावेळी यावल येथील सुनिल नेवे यांच्याकडून धान्याच्या गोण्या आयशर गाडी (एमएच 04 डी 7266) हिच्या मधुन गोडाऊन खाली करत होते. यावेळी रेशनच्या रीकाम्या गोण्या, मोकळा गहू मोठ्या प्रमाणात पडलेला होता. सदर गाडीच्या ड्रायव्हर याला या टीमने विचारले असता विलास चौधरी यांच्याकडे खाली करण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर टीमने अष्टविनायक नगर, जिआयएस कॉलनीच्या ठिकाणी असलेल्या गोडाऊनवर छापा टाकून गोडाऊनचे कुलुप तोडून आत प्रवेश करून मोठ्या प्रमाणात गहू साखर तांदुळ मकाचासाठा जप्त करण्यात आला.
रावेरात रात्रभर कारवाई करत दोघांवर गुन्हा
सदर कारवाई रात्रभर चालली व पहाटे ५ वाजेच्या सुमारास पुरवठा निरीक्षक हर्षल पाटील यांच्या फिर्यादीवरुन विलास चौधरी (रावेर), सुनिल नेवे (यावल) यांच्या विरुध्द जिवनाश्यक वस्तु कायदा 1955 कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हाचा तपास पो.नी.रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शना खाली पो.उप.नी.अमितसिंग देवरे पो.कॉ. विलास पहुरकर करीत आहे
रेशनचा जप्त केलेला असा आहे माल
3 लाख 57 हजार 300 रुपये किमतीच्या 50 किलो तांदूळाच्या 397 गोण्या
1 लाख 86 हजार रुपये किमतीच्या 100 किलो गहुच्या 93 गोण्या
43 हजार रुपये किमतीच्या 50 किलो साखरेच्या 43 गोण्या
50 हजार रुपये किमतीचे 50 किलो गहूच्या 50 गोण्या
8 लाख 74 हजार 50 किलो गव्हाच्या 874 गोण्या
13 लाख रुपये किमीतीच्या 50 किलो मक्याच्या 200 गोण्या तसेच 67शासकीय रीकामे गठ्ठे असे
एकूण 28 लाख 10 हजार 300 रुपयाच्या गहू, साखर, तांदूळ, मका जप्त करण्यात आला आहे.
रेशनच्या तस्करीवर स्थानिक प्रशासन गाफिल
रावेर शहरात जिल्हा पुरवठा अधिकारी येऊन छापा टाकून लाखो रूपयांचे धान्यसाठा जप्त करतो. परंतु येथील स्थानिक पुरवठाच्या लोकांना धान्यसाठया बद्दल जाणून-बुजुन माहिती नसते. त्यामुळे शासनाकडून येणाऱ्या गहू तांदुळ साखरचे ट्रक रावेरात येतात. मग खाली कुठे होतात. याबद्दल प्रश्न चिन्ह उपस्थिती होत आहे. स्थानिक शासकीय गोडाऊन किपिर काय करतो. याबद्दल रेशन माफिया व येथील स्थानिक पुरवठा विभागात साट-लोट असल्याची टिका स्थानिक जनतेतुन होत आहे.