चोपडा प्रतिनिधी । येथील भगिनी मंडळ, चोपडा संचलित, ललित कला केंद्राचा नुकताच निकाल लागला. फाऊंडेशन विभाग १०० टक्के, ए.टी.डी. प्रथम वर्ष १०० टक्के, द्वितीय वर्ष ९९ टक्के तर जी.डी. आर्ट पेंटिंग इंटरमिजिएट वर्ग आणि डिप्लोमा या वर्गांचा निकालही १०० टक्के लागला आहे.
शैक्षणिक वर्ष २०१८-१९ शासकीय उच्च कला परीक्षा महाराष्ट्र राज्य, कला संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षा २०१९ च्या सर्व वर्गांचा निकाल जाहीर झाला असून त्यात ललित कला केंद्र चोपड्याला घवघवीत यश मिळाले आहे. फाऊंडेशन विभाग १०० टक्के, ए.टी.डी. प्रथम वर्ष १०० टक्के, द्वितीय वर्ष ९९ टक्के तर जी.डी. आर्ट पेंटिंग इंटरमिजिएट वर्ग आणि डिप्लोमा या वर्गांचा निकालही १०० टक्के लागला आहे.
फाऊंडेशन विभागातून बारेला जगन डेगऱ्या (गौऱ्यापाडा) प्रथम तर पूजा अरुण महाजन (अमळनेर) द्वितीय आली. प्रथम वर्षात बंजारा विनोद मोहन (बभळाज) हा प्रथम तर पाटील कविता विजय (शिरपूर)ही द्वितीय आली आहे. तसेच द्वितीय वर्षात जयपाल युवराज राठोड(बभळाज) प्रथम तर नितीन राजेंद्र सावळे (किनगाव) हा द्वितीय आला आहे. तसेच जी.डी.आर्ट पेंटिंग इंटरमिजिएट वर्गात कोळी आत्माराम कडू (मुंबई) हा प्रथम तर डिप्लोमा अंतिम वर्ष वर्गात पाटील रणजीत दिलीप (भार्डू) येथील प्रथम आला. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा सौ. पुनम ताई गुजराथी, प्राचार्य राजेंद्र महाजन व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून कौतुक केले.