जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहर काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली आहे.
अखिल भारतीय कॉग्रेस कमिटीने राज्यातील १३ जिल्ह्यांच्या अध्यक्षांची नियुक्ती केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी या नियुक्त्या केल्या आहेत. यात जळगाव शहर काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहे. या अनुषंगाने पक्षाचे महासचिव के. सी. वेनुगोपाल यांच्या नियुक्तीचे पत्र पक्षास प्राप्त झाले आहे.
डॉ. राधेश्याम चौधरी हे २०१० पासून जळगावच्या सक्रिय राजकारणात आहेत. त्यांनी काँग्रेसच्या डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष, प्रवक्ता, सोशल मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष आदी जबाबदारी सांभाळली आहे. आगामी निवडणुकीआधी पक्षात चैतन्याचे वारे फुंकण्याचे आव्हान डॉ. राधेश्याम चौधरी यांच्यासमोर असणार आहे.