Home राज्य कोल्हापूर, साताऱ्यात पुरबळींची संख्या 43

कोल्हापूर, साताऱ्यात पुरबळींची संख्या 43

0
104

kolha

पुणे प्रतिनिधी । कोल्हापूर आणि सांगलीत आज दि. 12 ऑगस्ट रोजी आणखी तीन मृतदेह सापडल्याने पश्चिम महाराष्ट्रातील पुरबळींची संख्या ४३ वर पोहोचली आहे.

याबाबत माहिती अशी की, विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन पश्चिम महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांतील पूर परिस्थितीची माहिती दिली. सांगलीत काल रात्री २ तर कोल्हापुरात 1 मृतदेह सापडला आहे. या दोन्ही जिल्ह्यातील पुरात बेपत्ता झालेल्या 3 जणांचा अद्यापही शोध लागलेला नाहीय. आतापर्यंत ४,७४,२२६ नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले असल्याचे म्हैसेकर यांनी सांगितले आहे. पूरग्रस्तांसाठी राज्यसरकारने तातडीची पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही रोख रक्कम उद्याच पूरग्रस्तांपर्यंत पोहोचणार असून ३१३ एटीएम सेंटरमध्ये पैसै भरण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.


Protected Content

Play sound