चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील सांगवी येथून एकाचे अपहरण करून त्याला डांबून ठेवल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, सांगवी येथील राजाराम शंकर राठोड हा उसतोड कामगारांचा मुकादम म्हणून व्यवसाय करतो. त्याने सांगली जिल्ह्यातील एका साखर कारखान्यासोबत करार केला. तथापि, या करारानुसार तो मजूर पुरवू शकला नाही. यामुळे सांगली येथील नितीश भीमराव देशमुख, संदीप कुंभार व कृष्णा शंकर पवार यांनी त्याला सांगली येथे पळवून नेत डांबून ठेवल्याची तक्रार त्याच्या भावाने केली आहे. यानुसार चाळीसगाव शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.