Home शिक्षण सेंट ॲन्स इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पालक-शिक्षक सदस्य बैठक

सेंट ॲन्स इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पालक-शिक्षक सदस्य बैठक

0
38

khamgaon 1

बुलढाणा प्रतिनिधी । जिल्ह्यातील खामगाव येथील सेंट ॲन्स इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दि. 10 ऑगस्ट रोजी पालक-शिक्षक सदस्यांची शैक्षणिक 2019-2020 सत्राकरिता पहिली बैठक घेण्यात आली आहे.

यासंदर्भात माहिती अशी की, कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व पीटीए सदस्यांचे फातिमा मॅडम यांनी स्वागत केले. यानंतर मान्यवरांच्यावतीने शाळेच्या व मुलांच्या शैक्षणिक दृष्टीने काही सूचना मांडण्यात आल्या. यावर शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या मार्गदर्शनाने योग्य विचार मांडून त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे सांगण्यात आले. या बैठकीला शाळेच्या प्राचार्य सिस्टर ग्यान सुंदरी, शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सुजाता उबाळे, शिक्षिका फातिमा, श्रीकांत निखाडे, पवन राठी व सर्व नवनियुक्त पीटीए सदस्य यावेळी उपस्थितीत होते. कार्यक्रमाच्या समारोपीय मार्गदर्शन शाळेच्या ज्येष्ठ अनुभवी शिक्षिका फातिमा यांनी केले. यानंतर आभार प्रदर्शन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक-शिक्षकेतर व कर्मचा-यांनी अथक परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound