यावल, प्रतिनिधी | तालुक्यात सर्वत्र गेल्या दोन दिवसात झालेल्या संततधार पावसामुळे कोळवद गावात दोन बैल भिंतीखाली दाबले गेल्याने मरण पावले. याशिवाय अनेक गावांमध्ये घरांच्या भिंती कोसळल्याने सुमारे सात लाखांचे नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी झालेल्या पंचनाम्यातुन निष्पन्न झाले आहे.
या संदर्भात तहसीलदार कुवर यांनी दिलेल्या माहिती पत्रकात म्हटले आहे की, तालुक्यात ८ व ९ ऑगस्ट या दोन दिवसात सर्वत्र संततधार पावसाने हजेरी लावल्याने अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण होवुन यात तालुक्याक्यातील विरावली येथे सात, परसाडे येथे तीन, डोंगर कठोरा येथे तीन मारूळ व साकळी येथे प्रत्येकी दोन तर यावल, वड्री, न्हावी, सांगवी बु॥, कासारखेडा, सावखेडासिम येथे प्रत्येकी एक अशा २६ घरांच्या भिंती कोसळून सुमारे सात लाखांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात निष्पन्न झाले आहे. त्यातच कोळवद येथील चंद्रकांत गंगाधर राणे व नरेन्द्र एकनाथ राणे यांच्या दोन बैलांचा भिंत पडल्याने मृत्यु झाला आहे.