विवेक ठाकरे एआयएमआयएम’ कडून इच्छुक ; उमेदवारी मागणीसाठी अर्ज (व्हीडीओ)

2e1a2021 633d 47ea 8685 3d48a44adb87

 

भुसावळ (प्रतिनिधी) आगामी विधानसभा निवडणुकीत रावेर मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून घटक पक्ष असलेल्या दि ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादऊल मुसलमीन (AIMIM) पक्षाकडून उमेदवारी मिळावी म्हणून महाराष्ट्र राज्य परिट (धोबी) संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विवेक ठाकरे यांनी पक्ष संघटनेकडे उमेदवारीसाठी विहित नमुन्यातील अर्ज देत प्रस्ताव सादर केला.वंचित आघाडीकडून धुळ्यात घेण्यात आलेल्या इच्छुकांत सुद्धा श्री.ठाकरे यांनी मुलाखत दिली होती.त्यानंतर एमआयएम कडूनही उमेदवारीसाठी त्यांनी दावा केल्याने वेगळीच चर्चा सुरू आहे.

 

एमआयएम पक्षाकडून ४ पासून १० ऑगस्ट पर्यंत इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्विकारण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.त्यानुसार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा.इम्तियाज जलील यांच्या औरंगाबाद येथील मध्यवर्ती कार्यालयात पक्षाचे कार्यालय प्रमुख शेख अहेमद इलियास यांच्याकडे विवेक ठाकरे यांनी आपला अर्ज सादर केला.एमआयएम पक्षाचे रावेर लोकसभा क्षेत्राचे जिल्हा नेते फिरोज रहेमान शेख,महासचिव मुजाहिद शेख,भुसावल शहराध्यक्ष अशरफ तडवी,सचिव कलिम शेख आणि जळगाव येथील महापालिकेतील नगरसेविका यांचे प्रतिनिधी अक्रम देशमुख हे श्री.ठाकरे यांच्या उमेदवारीचा अर्ज सादर करतांना उपस्थित होते.

 

दरम्यान,विवेक ठाकरे हे रावेर-यावल तालुक्यातील ठेवीदारांचे नेते व जिल्ह्यातील बहुजन चळवळीतील प्रमुख चेहरा आहेत.रावेर तालुक्यातील सर्वात मोठ्या निंभोरा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि पाल येथील कृषी विद्यालय आणि डेअरी डिप्लोमा कॉलेजचे संस्थापक सचिव राहिले असल्याने त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे.

 

वंचित बहुजन आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या

एआयएमआयएम पक्षाकडून उमेदवारीची मागणी विवेक ठाकरे यांनी केल्याने मुस्लिमबहुल अशी ओळख असलेल्या रावेर विधानसभेच्या मतदारसंघातुन धोबी समाजाचे असतांना सुद्धा मुस्लिमांच्या ध्येय-धोरणांसाठी कार्यरत असलेल्या एएमआयएम पक्षाने गैरमुस्लिम म्हणून त्यांना उमेदवारी दिल्यास वेगळा निकाल हाती येऊ शक्यता नाकारता येत नाही.

 

Protected Content