Home Cities जळगाव गोदावरी अभियांत्रिकीच्या सुदीक्षा राजपूतची भरारी; ‘ब्रँन्डग्लो’ कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपर पदावर निवड

गोदावरी अभियांत्रिकीच्या सुदीक्षा राजपूतची भरारी; ‘ब्रँन्डग्लो’ कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपर पदावर निवड

0
7

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशन संचालित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शाखेच्या विद्यार्थिनीने आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवत मोठे यश संपादन केले आहे. २०२७ बॅचमधील विद्यार्थिनी सुदीक्षा राजपूत हिची ‘ब्रँन्डग्लो’ (Brandglow) या नामांकित आयटी कंपनीत ‘सॉफ्टवेअर डेव्हलपर’ या महत्त्वपूर्ण पदावर निवड झाली असून, तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सुदीक्षाने आपल्या संपूर्ण शैक्षणिक प्रवासात सातत्यपूर्ण अभ्यास, सखोल तांत्रिक कौशल्य आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तिची निवड ही केवळ वैयक्तिक यश नसून महाविद्यालयाच्या दर्जेदार शैक्षणिक परंपरेचे प्रतीक ठरली आहे. तिच्या या यशामुळे गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, तांत्रिक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या इतर विद्यार्थ्यांसाठीही तिने एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
सुदीक्षाच्या या विशेष कामगिरीबद्दल महाविद्यालयाच्या वतीने तिचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या हस्ते तिला पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी डॉ. विजयकुमार वानखेडे यांच्यासह प्रा. निलेश वाणी, प्रा. प्रशांत शिंपी, प्रा. कोमल पाटील आणि प्रा. देवपाल यादव आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व उपस्थित प्राध्यापकांनी सुदीक्षाचे मनःपूर्वक अभिनंदन करून तिला पुढील उज्ज्वल व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता उद्योगक्षेत्राच्या बदलत्या गरजेनुसार अद्ययावत तांत्रिक शिक्षण, कौशल्यविकास आणि रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध करून देण्यासाठी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय नेहमीच कटिबद्ध राहिले आहे. महाविद्यालयाच्या या नियोजनबद्ध प्रयत्नांचेच फलित म्हणून सुदीक्षासारखे विद्यार्थी नामांकित कंपन्यांमध्ये आपले स्थान निर्माण करत आहेत.
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शाखेतील विद्यार्थिनी सुदीक्षा राजपूत हिची ब्रँन्डग्लो कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपर पदावर निवड झाली आहे. तिच्या या यशाबद्दल प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील व प्राध्यापकांच्या हस्ते तिचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

Protected Content

Play sound