Home आरोग्य बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त युवासेनेतर्फे सलग सहाव्या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन; रक्तदानाचे...

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त युवासेनेतर्फे सलग सहाव्या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन; रक्तदानाचे आवाहन

0
5

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवासेनेतर्फे जळगाव शहरात सलग सहाव्या वर्षी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान नवीन बी. जे. मार्केट येथील इंडियन रेडक्रॉस सोसायटीमध्ये हे समाजोपयोगी शिबिर पार पडणार असल्याची माहिती युवासेना जिल्हाप्रमुख व धरणगावचे माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी दिली आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी युवासेनेच्या वतीने दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो. यंदा या उपक्रमाचे सहावे वर्ष असून, रुग्णांची रक्ताची निकड लक्षात घेता या शिबिराचे विशेष नियोजन करण्यात आले आहे. इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या सहकार्याने होणाऱ्या या शिबिरात रक्तदात्यांसाठी सर्व आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, आपल्या एका रक्तदानामुळे एखाद्या गरजू रुग्णाचे प्राण वाचू शकतात. या सामाजिक बांधिलकीतून व शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहण्यासाठी जळगावकर नागरिक, शिवसैनिक, युवासैनिक आणि तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे, असे आवाहन युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया आणि महानगर युवाधिकारी प्रीतम शिंदे यांनी केले आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त युवासेनेतर्फे मंगळवार, १७ नोव्हेंबर रोजी नवीन बी. जे. मार्केट येथील इंडियन रेडक्रॉस सोसायटीत सलग सहाव्या वर्षी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. युवासेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी, विभागीय सचिव विराज कावडीया आणि महानगर युवाधिकारी प्रीतम शिंदे यांनी जळगावकरांना या शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.

Protected Content

Play sound