Home Cities अमळनेर दिवाळीच्या सुट्टीत तरुणांचे श्रमदान; प्रगणे डांगरी ते मारवड रस्त्यावरील बुजविले खड्डे

दिवाळीच्या सुट्टीत तरुणांचे श्रमदान; प्रगणे डांगरी ते मारवड रस्त्यावरील बुजविले खड्डे

0
दिवाळीच्या सुट्टीत तरुणांचे श्रमदान; प्रगणे डांगरी ते मारवड रस्त्यावरील बुजविले खड्डे

अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | प्रगणे डांगरी ते मारवड या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांसह ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. रुग्ण, विद्यार्थी आणि वृद्ध नागरिकांचीही या खराब रस्त्यामुळे गैरसोय होत होती.
ही समस्या लक्षात घेऊन दिवाळीच्या सुट्टीनिमित्त गावी आलेल्या तरुणांनी गावातील युवकांसोबत एकत्र येत सामाजिक बांधिलकी जपली. शासकीय यंत्रणेची वाट न पाहता स्वतः पुढाकार घेत श्रमदानातून रस्त्यावरील मोठमोठे खड्डे बुजविले. त्यांच्या या उपक्रमामुळे वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे.
या श्रमदान उपक्रमात रणधीर पाटील, वीरभूषण पाटील, हर्षल पाटील, संदीप पाटील, संजय पाटील, दिनेश पाटील, हिलाल कोळी, लक्ष्मण पाटील, सचिन कोळी, सुनील वाडीले, निलेश पाटील, हंसराज पाटील, समाधान पाटील, सागर भोई, स्वप्निल कोळी, गोपाल पाटील, गजानन पाटील, दुर्गेश पाटील (राज), रोहित पाटील, राज वाघ, विशाल वाघ, जयेश कोळी, तुषार (ऋषि) पाटील, कल्पेश पाटील, हितेश पाटील, सौरव पाटील (ओम), यशोदीप पाटील (यश), आदित्य पाटील, गौरव (गोलू) कोळी, सार्थक पाटील, शिवा कोळी आणि धिरज कोळी यांनी सहभाग घेतला.
दिवाळीची सुट्टी केवळ आनंदोत्सवासाठी न घालवता गावाच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी तरुणांनी केलेले श्रमदान कौतुकास्पद ठरत असून, त्यांच्या एकजुटीतून सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण झाला आहे.