मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राज्यात दुष्काळाचे सावट असताना गोरगरीब व गरजू कुटुंबांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, या उद्देशाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने दिवाळी शिधा वाटप उपक्रम राबविण्यात येत आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात ५ हजार शिधा किटचे वितरण करण्यात आले.
८ नोव्हेंबर रोजी मुक्ताईनगर शहरातील श्रीरामनगर परिसरात आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यानंतर मतदारसंघातील विविध भागांमध्ये शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांपर्यंत शिधा किट पोहोचविण्यात आले. दुष्काळी परिस्थिती आणि आर्थिक अडचणींमुळे दिवाळी साजरी करताना अडचणींचा सामना करणाऱ्या कुटुंबांना या मदतीमुळे दिलासा मिळाला.
गरजू कुटुंबांच्या दिवाळीत आनंद निर्माण व्हावा, या सामाजिक उद्देशाने राबविण्यात आलेल्या उपक्रमाबद्दल लाभार्थ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.