Home क्राईम जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई! मोटारसायकल चोरीचे दोन गुन्हे उघड ; दोन दुचाकी...

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई! मोटारसायकल चोरीचे दोन गुन्हे उघड ; दोन दुचाकी हस्तगत

0
5

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरासह परिसरातून मोटारसायकली चोरी करणाऱ्यांविरोधात एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करत चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत एका ३४ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन बालकाकडूनही चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. पोलिसांनी एकूण दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

जळगाव शहरातील शनिपेठ परिसरातील रहिवासी तरबेज सैय्यद आसिफ यांनी १ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास त्यांची काळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल (क्रमांक एमएच १९ टी ७७७०) अजिंठा चौफुलीजवळील ईदगाह कॉम्प्लेक्स येथील रिलायबल लॉजिंगच्या खाली पार्किंगमध्ये उभी केली होती. वैयक्तिक काम आटोपून परत आल्यानंतर त्यांना पार्किंगच्या ठिकाणी दुचाकी आढळून आली नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८८९/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) नुसार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी गुन्हे शोध पथकाला सूचना दिल्या. पथकाने गोपनीय बातमीदारांची माहिती, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे चोरी करणाऱ्या संशयिताची ओळख पटवली. त्यानंतर ३ नोव्हेंबर रोजी सापळा रचून सुलेमान अरमान तडवी (वय ३४, रा. किनगाव, ता. यावल) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून सुमारे १० हजार रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी हस्तगत करण्यात आली.

दरम्यान, दुसऱ्या घटनेत जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील रहिवासी कैलास पाटील यांच्या मालकीची काळ्या रंगाची हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल (क्रमांक एमएच १९ डीएस ५१४०) २५ ऑक्टोबर २०२६ रोजी कुसुंबा शिवारातून चोरीला गेली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तपणे केला. तपासादरम्यान चोरी करणाऱ्या अल्पवयीन बालकाची ओळख निष्पन्न झाली. त्याच्याकडून चोरीची हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल पोलिसांनी हस्तगत केली. या दोन्ही कारवायांमुळे मोटारसायकल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले असून, चोरीस गेलेल्या दोन्ही दुचाकी पोलिसांनी परत मिळवल्या आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक विजयसिंग पाटील, पोलीस हवालदार रामकृष्ण पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण चौधरी, गिरीश पाटील, गजानन महाजन, पोलीस कॉन्स्टेबल विशाल कोळी, सुभाष साबळे, ललित नारखेडे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार विष्णू बिर्‍हाडे, दीपक माळी, रवींद्र पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल रावसाहेब पाटील यांनी सहभाग घेतला.

 


Protected Content

Play sound