Home धर्म-समाज सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त फैजपूर पोलिसांतर्फे ‘एकता दौड’ !

सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त फैजपूर पोलिसांतर्फे ‘एकता दौड’ !

0
10

फैजपूर, ता. यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त तसेच राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून फैजपूर पोलीस स्टेशनच्या वतीने शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी शहरात ‘एकता दौड’चे आयोजन करण्यात आले.

फैजपूर शहरातील सुभाष चौक येथून या दौडीला सुरुवात होऊन साखर कारखान्यापर्यंत तिचा समारोप झाला. या उपक्रमात फैजपूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार, शहरातील नागरिक तसेच विविध राजकीय पदाधिकारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या एकता दौडमध्ये विद्यार्थ्यांनीही उत्साहाने सहभाग घेत आपली क्रीडा कौशल्ये दाखवून दिली. यामध्ये मयूर ईश्वर सोनवणे यांनी प्रथम क्रमांक, रोशन सतीश सोनवणे यांनी द्वितीय क्रमांक, तर प्रमोद राजू सोनवणे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या एकात्मतेसाठी दिलेल्या योगदानाची आठवण करून देणाऱ्या या उपक्रमातून राष्ट्रीय एकता, बंधुभाव, शिस्त आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देण्यात आला.

फैजपूर पोलिसांच्या या उपक्रमाचे शहरवासीयांकडून कौतुक होत असून विजेत्या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound