यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पोलीस बॉईज असोसिएशनने केलेल्या मागणीनुसार आता एसआरपीएफमध्ये लवकरच महिलांची स्वतंत्र बटालियन तयार करण्यात येणार आहे.
राज्यातील हजारो महिलांना आणि मुलींना आता SRPF मध्ये नोकरीची संधी उपलब्ध होणार ! केंद्र सरकार च्या धरतीवर { CRPF / CISF / BSF / ITBP } या घटकांमध्ये महिलांची भरती असून स्वतंत्र महिला बटालियन देखील कार्यरत आहेत त्याच प्रमाणे विविध राज्यांमध्ये पोलीस दलात सुद्धा महिलांची मोठ्या प्रमाणावर भरती केली जाते , परंतु राज्य राखीव पोलीस दलात म्हणजेच एसआरपीएफमध्ये मात्र महिलांची भरतीही होत नाही. त्यामुळे भरती होण्याची पात्रता असूनही महिलांना / तरुणींना संधी मिळत नाही आणि त्यामुळे एसआरपीएफ मध्ये सुद्धा महिलांची भरती घेऊन त्यांची स्वतंत्र बटालियन स्थापन करण्यात यावी अशी मागणी पोलीस बॉईज असोसिएशन तर्फे सन 2022 पासून केली होती.

अखेर या मागणीवर महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री योगेश रामदास कदम यांनी पोलीस महासंचालक कार्यालय मुंबई येथे राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते अतिरिक्त पोलीस महासंचालक निखिल गुप्ता, अतिरिक्त पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक निधीश मिश्रा यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन ” राज्य राखीव पोलीस दलात महिलांची स्वतंत्र बटालियन स्थापन करण्यासाठी यशस्वी आणि सकारात्मक चर्चा केली आहे. त्यामुळे आता लवकरच महाराष्ट्रातील महिलांना आणि तरुणींना पोलीस भरती प्रमाणे राज्य राखीव पोलीस दलात सुद्धा नोकरीची संधी उपलब्ध होणार असल्यामुळे राज्यातील महिला आणि तरुणींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तसेच खास करून राज्य राखीव पोलीस दलातील अनुकंपामधील ज्या महिला आणि मुली आहेत त्यांना आता सफाई कामगार किंवा मदतनीस म्हणून काम करण्याची गरज भासणार नाही , त्यांना देखील एसआरपीएफ मध्ये वडिलांच्या किंवा पतीच्या जागेवर जवान म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध होणार असल्यामुळे एसआरपीएफ कुटुंबातील अनुकंपधारक महिलांनी आणि मुलींनी प्रमोद तानाजी वाघमारे भूषण नागरे हेमंत तावडे यांचे आभार मानले आहेत.



