Home Cities जळगाव जिल्हा बँक निवडणुकीसाठी भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गोपाळ भंगाळे यांचा उमेदवारी अर्ज...

जिल्हा बँक निवडणुकीसाठी भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गोपाळ भंगाळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
11

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गोपाळ भंगाळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी ओबीसी मतदारसंघासह इतर संस्था मतदारसंघातून उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी भाजप पदाधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

गोपाळ भंगाळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत आपली दावेदारी मांडली आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीतील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विविध गटांकडून उमेदवारी अर्ज दाखल केले जात असल्याने राजकीय हालचालींना महत्त्व प्राप्त झाले आहे.

यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस राजूभाऊ सोनवणे, जळगाव तालुकाध्यक्ष मिलिंद चौधरी, भाऊसाहेब पाटील, वासुदेव कोळी, मयूर मराठे, शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष किशोर चौधरी, विनोद साबळे आणि ॲड. भोलनकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत गोपाळ भंगाळे यांनी ओबीसी आणि इतर संस्था मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने त्यांच्या उमेदवारीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound