Home क्राईम जळगाव जिल्ह्यात पोलिसी बडगा ! अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई ; ३२...

जळगाव जिल्ह्यात पोलिसी बडगा ! अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई ; ३२ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त

0
6


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे अवैध वाळू उत्खनन आणि चोरीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिलेल्या कठोर निर्देशानुसार, कासोदा आणि पारोळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत संयुक्त व स्वतंत्र कारवाया करत एकाच दिवसात तब्बल ६ गुन्हे दाखल करण्यात आले असून, ६ जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या धडक कारवाईत वाळू आणि वाहनांसह एकूण ३२ लाख ४७ हजार ५५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नदीपात्रांमधील वाळूचोरी रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना विशेष पथके तयार करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, मिळालेल्या माहितीच्या आधारे दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ रोजी कासोदा आणि पारोळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गिरणा नदीपात्र व परिसरामध्ये छापे टाकण्यात आले. या मोहिमेत अवैध वाळूची वाहतूक करणारे डंपर, ट्रॅक्टर आणि मोठ्या प्रमाणावर वाळू जप्त करण्यात आली आहे.

कासोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गिरणा नदीपात्र, करदन शिवार, आणि हनुमानत खेडेसीम शिवार परिसरात धाडी टाकून ५ वेगवेगळे गुन्हे नोंदविण्यात आले. यामध्ये आयशर डंपर, टाटा डंपर आणि स्वराज ट्रॅक्टरसह विविध ठिकाणाहून वाळूचा साठा जप्त करण्यात आला. तसेच, पारोळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत किसन कॉलेजजवळ जुन्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ जवळ कारवाई करत आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला असून पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत देखील कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते (चाळीसगाव परिमंडळ), उपविभागीय पोलीस अधिकारी  विजयकुमार ठाकुरवाड आणि  विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पारपार पाडण्यात आली. यामध्ये पारोळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. दिपक पाटील, कासोदा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील आणि त्यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदारांनी अत्यंत उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. जिल्हəात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांची ही आक्रमक भूमिका कायम राहणार, असा स्पष्ट इशारा या कारवाईमुळे दिला गेला आहे.


Protected Content

Play sound