Home Cities भुसावळ पाणीटंचाईचा धोका लक्षात घेऊन जलस्रोत वाचवा; विनोद झोपे यांची मागणी

पाणीटंचाईचा धोका लक्षात घेऊन जलस्रोत वाचवा; विनोद झोपे यांची मागणी

0
10


वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वरणगाव शहरातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता हनुमान नगर आणि गणपती नगर परिसरातील जुन्या सार्वजनिक विहिरींची स्वच्छता करून त्यांचे पुनरुज्जीवन करावे, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक विनोद गणेश झोपे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी २६ ऑक्टोबर रोजी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले आहे.

प्रभाग क्रमांक १० ‘ब’ मधील या विहिरी नाल्याच्या काठावर असून गाळ, कचरा आणि दूषित पाण्यामुळे अस्वच्छ झाल्या आहेत. त्यामुळे विहिरींची तातडीने पाहणी करून त्यातील गाळ व कचरा काढावा, दूषित पाणी बाहेर काढावे आणि आवश्यक स्वच्छता व निर्जंतुकीकरण करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

विहिरींची स्वच्छता झाल्यानंतर पाण्याची गुणवत्ता तपासून ते वापरण्यास सुरक्षित असल्याची खात्री करावी, असेही झोपे यांनी नमूद केले आहे. आगामी काळात पाणीटंचाई निर्माण झाल्यास या विहिरी पर्यायी जलस्रोत म्हणून उपयोगी ठरू शकतात. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.

या निवेदनामुळे हनुमान नगर आणि गणपती नगरमधील जुन्या विहिरींच्या स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, नगर परिषद प्रशासन याबाबत कोणती कार्यवाही करते, याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound