
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | छावा मराठा युवा महासंघाच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी ॲड. राजेश पावसे (मराठे), तर महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सौ. नीलू इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अमोल कोल्हे यांच्या हस्ते दोन्ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले.

ॲड. राजेश पावसे हे शिवसेनेचे महानगर उपाध्यक्ष असून, छावा मराठा युवा महासंघात त्यांनी यापूर्वी कायदेविषयक सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. संघटनेतील त्यांचा अनुभव आणि सामाजिक कार्यातील सहभाग लक्षात घेऊन त्यांच्यावर जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
दरम्यान, सौ. नीलू इंगळे या सारांश फाऊंडेशनच्या अध्यक्ष असून, सन २०२३ पासून छावा मराठा युवा महासंघाच्या महिला आघाडीच्या महानगराध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. महिला संघटन आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या कामाची दखल घेत त्यांची महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
दोन्ही पदाधिकाऱ्यांना संघटनेच्या कामाचा अनुभव असल्याने त्यांच्या नव्या जबाबदारीमुळे जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होईल, तसेच विविध सामाजिक उपक्रमांना गती मिळेल, अशी अपेक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
या नियुक्तीबद्दल ॲड. राजेश पावसे आणि सौ. नीलू इंगळे यांचे छावा मराठा युवा महासंघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



