Home क्राईम पान-सिगारेटच्या उधारीतून प्राणघातक हल्ला करणारे आरोपी 12 तासांत जेरबंद!

पान-सिगारेटच्या उधारीतून प्राणघातक हल्ला करणारे आरोपी 12 तासांत जेरबंद!

0
16


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | उधारीवर पान-सिगारेट देण्यास नकार दिल्याच्या किरकोळ कारणावरून जळगाव शहरातील गोदावरी कॉलेज परिसरात एका ४१ वर्षीय व्यक्तीवर कोयता आणि तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणातील आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत ताब्यात घेतले असून, एका विधी संघर्षित बालकाचाही यात समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर माधवराव बाविस्कर (वय ४१) यांनी आरोपींना उधारीवर पान-सिगारेट देण्यास नकार दिला होता. याच कारणावरून आरोपींनी त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली. त्यानंतर “तुम्हा दोन्ही भावांना जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देत बाविस्कर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.

वाद वाढल्यानंतर आरोपी आनंद हरी पाटील याने त्याच्याजवळील धारदार कोयत्याने, तर हर्षल रवींद्र शिंदे याने तलवारीने बाविस्कर यांच्यावर हल्ला केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते.

या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या १२ तासांत संशयित आरोपी आनंद हरी पाटील (वय २४), हर्षल रवींद्र शिंदे (वय २०), गौरव विनोद पाटील (वय २०, सर्व रा. खेडी, ता. जि. जळगाव) यांना ताब्यात घेतले. तसेच या प्रकरणात एका विधी संघर्षित बालकाचाही समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८७०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १०९(१), ३५१(२), ३५२, ३(५) तसेच आर्म्स ॲक्टच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार करीत आहेत


Protected Content

Play sound