रावेर प्रतिनिधी । परिसरात काल रात्रीपासून पावसाची धुंवाधार बॅटिंग सुरु असल्यामुळे नदी-नाल्यांना पुर आला आहे. याचबरोबर शाळांमध्ये मोठे पाणी साचले आहे. तसीलदार उषाराणी देवगुणे यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून अनुचीत घटना घडणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, परीसरात व आदिवासी भागात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे सकी नदीला पुर आला असून भोकर नदी, नागोई नदी, मात्रण या नद्यांसह शहरातून वाहणारी नागझिरी नदीला देखील चांगलेच पाणी आले आहे. मंगळुर धरण अर्धामीटर तर सुकी धरण एक मीटरने खाली असून कोणत्याही क्षणी ते भरले जाऊ शकते, असे मध्यम प्रकल्प विभागाचे महेश पाटील यांनी सांगितले आहे. तसेच शहरातील सरदार जी.जी. हायस्कूल, यशवंत विद्यालयासोबत अनेक शाळांमध्ये पावसाचे पाणी साचायला सुरुवात झाली आहे.