Home Cities जळगाव गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात तीन दिवसीय नवरात्रोत्सवाची धूम ; गरबा-दांडियात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात तीन दिवसीय नवरात्रोत्सवाची धूम ; गरबा-दांडियात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

0
9

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथे तीन दिवसीय नवरात्रोत्सव पारंपरिक वेशभूषा, गरबा-दांडियाचा उत्साह आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांच्या सादरीकरणाने जल्लोषात साजरा करण्यात आला. विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. पारंपरिक पोशाख, आकर्षक नृत्याविष्कार आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे महाविद्यालय परिसरात नवरात्रोत्सवाची रंगत अनुभवायला मिळाली.

या तीन दिवसीय उत्सवात विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजक आणि सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बेस्ट कॉस्च्युम/आउटफिट स्पर्धा, बेस्ट कपल दांडिया स्पर्धा आणि ग्रुप गरबा स्पर्धेचा समावेश होता. याशिवाय विद्यार्थ्यांमधून गरबा किंग आणि गरबा क्वीन यांचीही निवड करण्यात आली. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी गरबा आणि दांडियाच्या माध्यमातून आपली नृत्यकला व सांस्कृतिक प्रतिभा सादर केली. नवरात्रोत्सवाच्या अंतिम दिवशी गोदावरी फाउंडेशनचे सदस्य आणि प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. अनिकेत पाटील यांच्या हस्ते विविध स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. बेस्ट कॉस्च्युम/आउटफिट स्पर्धेत सानिका कारंडे आणि रोहित पाटील यांनी पुरस्कार पटकावला. बेस्ट कपल दांडिया स्पर्धेत अनुष्का बऱ्हाटे आणि सुमित थिगळे यांची निवड झाली. ग्रुप गरबा स्पर्धेत एल.वाय. ग्रुपने बाजी मारली. गरबा किंगचा मान वृषभ सुतार याला, तर गरबा क्वीनचा मान अश्विनी ठाकरे हिला मिळाला. विजेत्यांना पारितोषिके प्रदान करून त्यांच्या कलागुणांचे कौतुक करण्यात आले. विविध स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली, तसेच त्यांच्यातील सांस्कृतिक सहभाग आणि सामूहिक उत्साहाला प्रोत्साहन मिळाले.

या नवरात्रोत्सवाचे समन्वयन महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. नकुल गाडगे यांनी केले, तर विद्यार्थिनी देवयानी पाटील हिने सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील आयोजक आणि सहभागी विद्यार्थ्यांनी योगदान दिले. नवरात्रोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी आयोजकांचे तसेच सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच आपल्या कलागुणांना वाव देण्याची संधी मिळते आणि महाविद्यालयातील सांस्कृतिक वातावरण अधिक समृद्ध होते.


Protected Content

Play sound