चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील भाजप शाखा व मंगेश दादा मित्र परिवारातर्फे दोन दिवशीय दि. 8 व 9 ऑगस्ट रोजी सांगवी येथे मोफत भव्य नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील युवा नेते मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत आज सकाळी शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. नंदुरबार येथील कांतालक्ष्मी शह रुग्णालयाच्या सहकार्याने हे शिबिर घेण्यात आले. शिबिरात डॉ. सुरज सदाशिव, डॉ. अभिजीत खेडकर आणि डॉ. कोळी यांनी रुग्णांची तपासणी केली. शिबिराला गावातील व परिसरातील रुग्णांचा प्रचंड प्रतिसाद लाभला होता. हे शिबिर आज व उद्याही घेण्यात येणार आहे. शिबिराच्या शुभारंभी मनोगत व्यक्त करताना मंगेश चव्हाण म्हणाले की, “ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचावी, हा प्रामाणिक हेतू ठेवून या शिबिराचे आम्ही आयोजन केले आहे. या गावातील ऊस तोडणी कामगारांच्या समस्या माझ्या कानावर आल्या असून त्या सोडवण्यासाठी शासकीय योजनांची माहिती घेऊन त्या योजना मोठ्या प्रमाणावर येथे लाभदायक ठरतील अशा प्रकारे लागू करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. लवकरच, या गावाला एक पेटी देण्यात येऊन तिचे लोकार्पण केले जाईल. तसेच पुढील वर्षी गावातील माता-भगिनींना वृद्ध व्यक्तींना माझ्याकडून पंढरपूरची वारी ही घडवेल. मी केवळ राजकीय आश्वासने न देता जे बोललोय त्याप्रमाणे कृती करेल. चाळीसगाव तालुक्यातील सर्व स्तरातील लोकांना सोबत घेऊन काम करण्याचा संकल्प मी केला आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी पंचायत समिती सदस्य सतीश पाटे, माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, भाजपाच्या तालुका सरचिटणीस सुनील निकम, रोहिणी गावाचे सरपंच अनिल नागरे व विजय कदम आदी मान्यवर उपस्थित होते. याशिबीर प्रसंगी सांगवी ग्रामपंचायतीचे सरपंच महेंद्र सिंग राठोड, पोलीस पाटील, ज्ञानेश्वर पाटील, उपसरपंच हिरामण जाधव व ग्रामपंचायत सदस्य बंडू चव्हाण, सचिन ठाकरे, उखा राठोड, महादू राठोड, प्रमोद पवार, उत्तम पाटील आदी उपस्थितीत होते.