Home Cities मुक्ताईनगर काकोडा-कुऱ्हा येथे शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन! राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह ग्रामपंचायत सदस्यांचा शिंदेसेनेत प्रवेश

काकोडा-कुऱ्हा येथे शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन! राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह ग्रामपंचायत सदस्यांचा शिंदेसेनेत प्रवेश

0
12

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील काकोडा (कुऱ्हा) येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) मधील कार्यकर्त्यांसह ग्रामपंचायत सदस्य आणि अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे काकोडा-कुऱ्हा परिसरात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढल्याचा दावा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. या प्रवेशामुळे परिसरातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा आणि विकासाच्या कार्याला प्राधान्य दिले जात असल्याचे सांगत या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. स्थानिक पातळीवर पक्षाचे संघटन अधिक मजबूत करणे, नागरिकांच्या प्रश्नांसाठी सक्रियपणे काम करणे आणि विकासकामांना गती देणे, या उद्देशाने पक्षात प्रवेश केल्याचे पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर सांगण्यात आले.

या पक्षप्रवेश सोहळ्यात ग्रामपंचायत सदस्य मनोज हिवरकर, विलास पाटील, माजी सरपंच निजाम शाह, माजी ग्रामपंचायत सदस्य भागवत बगाडे, रामराव पाटील, शेषराव पाटील, सोपान खोले, शहाजी पाटील, वासुदेव पाटील, शेषराव उखर्डा पाटील, किशोर खवले, शामराव पाटील, शब्बीर शहा, मंगेश खवले, दिनेश कोल्हे, तुषार पाटील, अमोल भोलानकर, रामेश्वर भोलानकर, संदीप भोलानकर, भागवत गुरव, अमोल घाटे, कदीर शाह, रोशन शाह, सफिक शाह, इमाम शाह, रामदास भोलानकर, ऋषि पाटील, राहुल पाटील आणि महादेव भोलानकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख छोटूभाऊ भोई, युवासेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, शिवसेना तालुकाप्रमुख नवनीत पाटील, शिवसेना अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष अफसर खान, लाडकी बहीण रावेर तालुकाप्रमुख राहुल पाटील सर, शिवसेना तालुका संघटक महेंद्र मोंढळे, उपतालुकाप्रमुख पंकज पांडव, शिवसेना विभागप्रमुख विनोद पाटील आणि सतीश नागरे उपस्थित होते.

तसेच रावेर लोकसभा संपर्कप्रमुख (सोशल मीडिया) दीपक वाघ, शिवसेना अनुसूचित जाती-जमाती तालुकाध्यक्ष राजूभाऊ वानखेडे, शहरप्रमुख मंगेश पाटील, शैलेश पाटील, नगरसेवक वसंत भलभले आणि गणेश पाटील यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले.

काकोडा-कुऱ्हा परिसरात झालेल्या या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेच्या स्थानिक संघटनात्मक बांधणीला बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा, विकास आणि स्थानिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

 


Protected Content

Play sound