अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील गंभीर दुष्काळजन्य परिस्थिती, शेतमालाला योग्य भाव, पीक विम्यातील त्रुटी आणि शेतकऱ्यांच्या इतर विविध प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे प्रमुख तथा प्रख्यात शेतकरी नेते मा. श्री. रविकांत तुपकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य शेतकरी सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही भव्य जाहीर सभा मंगळवार, १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७:०० वाजता मांडळ (ता. अमळनेर) येथे पार पडणार आहे. अमळनेर तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्या सरकारदरबारी मांडण्यासाठी आणि त्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी या सभेचे विशेष नियोजन करण्यात आले आहे.

या जाहीर सभेत शेतकरी नेते रविकांत तुपकर हे उपस्थितांना मार्गदर्शन करताना तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतमालाचा भाव आणि पीक विमा भरपाईबाबत पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट करणार आहेत. ‘क्रांतीकारी शेतकरी संघटना, महाराष्ट्र राज्य’ यांच्या वतीने आयोजित या सभेसाठी अमळनेर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी, शेतमजुरांनी आणि ग्रामस्थांनी ‘चलो मांडळ’चा नारा देत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



