Home क्राईम कोळन्हावी येथे तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

कोळन्हावी येथे तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

0
19

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील कोळन्हावी येथे एका ३५ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, यावल पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निलेश प्रल्हाद इंगळे (वय ३५, रा. कोळन्हावी, ता. यावल) यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. ही बाब त्यांच्या कुटुंबीयांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी निलेश इंगळे यांना तातडीने उपचारासाठी जळगाव येथील जिल्हा वैद्यकीय शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी निलेश इंगळे यांना मृत घोषित केले. त्यानंतर या घटनेची माहिती यावल पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून केली आहे. पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. निलेश इंगळे यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. पोलिसांच्या तपासातून घटनेमागील कारण समोर येण्याची शक्यता आहे.


Protected Content

Play sound