Home क्राईम कोथळीत महिलेच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल; शिवीगाळ, अश्लील इशारे व धमकी दिल्याचा...

कोथळीत महिलेच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल; शिवीगाळ, अश्लील इशारे व धमकी दिल्याचा आरोप

0
17

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील कोथळी येथे काहीही कारण नसताना घराच्या अंगणात बेकायदेशीरपणे प्रवेश करून महिलांना तसेच मुलींना अश्लील शिवीगाळ करत मारहाण आणि असभ्य वर्तन केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी कोथळी येथील ४६ वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, पद्माकर प्रभाकर खडसे आणि अजय प्रकाश अढायके, दोघेही रा. कोथळी, यांनी कोणतेही कारण नसताना फिर्यादीसह गल्लीतील नागरिकांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.

तक्रारीत नमूद केल्यानुसार, आरोपी पद्माकर खडसे याने फिर्यादीस उद्देशून अपशब्द वापरत धमकीवजा वक्तव्य केल्याचा आरोप आहे. तसेच दुसरा आरोपी अजय अढायके याने फिर्यादीला उद्देशून अश्लील भाषेत बोलून, आपल्याकडे येण्यास सांगत अश्लील इशारे केले आणि धमकी दिल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले आहे.

या तक्रारीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ०३७६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २९६, ७९, ३५१(२), ३५२ आणि ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नोंदीनुसार, घटनेच्या वेळी घटनास्थळी कोणतेही हत्यार वापरले गेले नसल्याची नोंद असून, या प्रकरणात आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. पोलीस निरीक्षक आशिष आडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संदिप वानखेडे हे पुढील तपास करीत आहेत.


Protected Content

Play sound