Home Cities चाळीसगाव अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाला विरोध; खाजगी क्षेत्रात आरक्षणासाठी ४ ऑक्टोबरला विराट मोर्चा

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाला विरोध; खाजगी क्षेत्रात आरक्षणासाठी ४ ऑक्टोबरला विराट मोर्चा

0
11

पाचोरा/चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण लागू करू नये, खाजगी क्षेत्रात अनुसूचित जातींसाठी आरक्षणाची तरतूद करावी तसेच सरकारी नोकऱ्यांमधील बॅकलॉग तातडीने भरावा, या प्रमुख मागण्यांसाठी ४ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात पाचोरा आणि चाळीसगाव परिसरातील आंबेडकरवादी जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संघर्ष समितीचे संयोजक मुकुंद सपकाळे यांनी केले.

या मोर्चाच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा आणि चाळीसगाव येथे बैठका घेण्यात आल्या. या बैठकींमध्ये अनुसूचित जातींच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. राज्य सरकारने अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करण्याची प्रक्रिया राबवू नये, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली. तसेच खाजगी क्षेत्रातही अनुसूचित जातींना आरक्षण लागू करण्याची मागणी करण्यात आली.

सरकारी नोकरीतील अनुसूचित जातींच्या आरक्षित पदांचा बॅकलॉग तातडीने भरून काढण्यात यावा, अशीही प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. रिक्त असलेल्या आरक्षित पदांवर विशेष भरती मोहीम राबवून अनुशेष भरून काढावा, अशी मागणी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ४ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मुकुंद सपकाळे यांनी दिली. पाचोरा आणि चाळीसगाव तालुक्यातील आंबेडकरवादी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि कार्यकर्त्यांनी मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी बैठकीदरम्यान केले.

पाचोरा येथे झालेल्या बैठकीसह चाळीसगावमधील बैठकीतही मोर्चाच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. मोर्चाच्या माध्यमातून अनुसूचित जातींच्या आरक्षणाशी संबंधित मागण्या प्रशासनासमोर ठामपणे मांडण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

यावेळी राजू मोरे, खलील देशमुख, आनंद नवगिरे, नगरसेवक प्रवीण ब्राह्मणे, गोवर्धन अहिरे, शांताराम अहिरे, नगरसेवक रोशन जाधव, नगरसेवक संभाजी जाधव, भैय्या ब्राह्मणे, संजय सोनवणे, संगम गवळे, मुकेश नेतकर, किरण मोरे, गौतम जाधव, सोनालीताई ब्राह्मणे, बबलू जाधव, चंद्रमणी सूर्यवंशी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound