Home करियर जळगावात २९ सप्टेंबरला रोजगार महाकुंभ ; विविध कंपन्यांमध्ये नोकरीची संधी

जळगावात २९ सप्टेंबरला रोजगार महाकुंभ ; विविध कंपन्यांमध्ये नोकरीची संधी

0
10


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगावातील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्ष आणि कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ‘रोजगार महाकुंभ’ मेगा जॉब फेअर २०२६ आयोजित करण्यात आला आहे.

हा रोजगार मेळावा मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता जळगाव येथील युवासिटी, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (KBCNMU) येथे होणार आहे. या रोजगार मेळाव्यात सहभागी होणाऱ्या उमेदवारांना विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकतेसाठी मार्गदर्शन मिळण्यासोबतच इच्छुक उमेदवारांना नोकरीच्या संधी मिळणार असल्याने जिल्ह्यातील युवकांसाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.

विद्यापीठाच्या केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्ष तसेच कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या संयुक्त पुढाकारातून हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound