रावेर, प्रतिनिधी | जम्मू व कश्मीरमधील कलम ३७० व आर्टिकल ३५ ए पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतीहासीक निर्णय घेऊन रद्द केल्या निमित्ताने शहरातील काही सुज्ञ नागरिकांनी खुश होऊन नागरिकांना जेवण दिले.
आहे. या बाबत वृत्त असे की, शहरातील कृषी उपन्न बाजार समितीच्या कॉम्प्लेक्समध्ये महाजन ऑटोचे मालक बाळु महाजन, लाल मिर्ची व्यापारी सजंय पाटील, चक्रधर कन्ट्रक्शनचे समाधान पाटील, विकासोचे सचिव भावराव पाटील, स्टडी सर्कलचे शक्ती सोहणी, यांनी हा जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता.