Home Cities जळगाव इकरा थीम कॉलेजमध्ये पुरातन वस्तू, नाणी व नोटांचे भव्य प्रदर्शनाचे आयोजन !

इकरा थीम कॉलेजमध्ये पुरातन वस्तू, नाणी व नोटांचे भव्य प्रदर्शनाचे आयोजन !

0
7


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगावच्या मेहरूण परिसरातील एच. जे. थिम इकरा कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स येथे पुरातन व दुर्मिळ वस्तू, नाणी आणि नोटांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

अ. मजीद झकेरिया बीबा परिवार आणि इकरा एच. जे. थिम कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनात जुनी व दुर्मिळ नाणी, ऐतिहासिक नोटा, टपाल तिकिटे तसेच विविध ऐतिहासिक वस्तू पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.

हे प्रदर्शन शनिवार, १९ सप्टेंबर ते सोमवार, २१ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. प्रदर्शनाचे ठिकाण इकरा एच. जे. थिम कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, मेहरूण, जळगाव आहे.

इतिहास, संस्कृती आणि जुन्या वस्तूंची आवड असलेल्या नागरिकांसाठी हे प्रदर्शन विशेष आकर्षण ठरणार असून, नागरिकांनी या दुर्मिळ ऐतिहासिक ठेव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound