मुंबई प्रतिनिधी । येत्या 22 ऑगस्टपासून आंध्रप्रदेश येथे होणारा स्पर्धेत महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनचा व्हिज्जी चषक स्पर्धेसाठी मुंबईच्या 15 सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अर्जुनने काऊंटी क्रिकेटमध्ये आपल्या चांगल्या कामगिरीनं स्वतःला सिद्ध केले आहे. भारतीय अंडर-19 संघाचा डावखुरा गोलंदाज अर्जुन इंग्लंडमधल्या एमसीसी यंग क्रिकेटर्सकडून खेळत होता. त्यानं वेगवान गोलंदाजीच्या जोरावर एका फलंदाजाला क्लीन बोल्ड केलं. त्यानंतर सर्वच स्तरावरून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला आहे. सरेनं पहिल्यांदा टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यातील दुसऱ्या षटकाची अर्जुनला संधी मिळाली. अर्जुननं दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर समोरच्या फलंदाजाचा त्रिफळा उडवला. फलंदाजाला बचावाची संधी न देता त्यानं फलंदाजाची मधलीच दांडी गुल केली. अर्जुननं हा चेंडू वेगानं टाकला होता. अर्जुन तेंडुलकराच्या या शानदार चेंडूला लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडनं शेअर केला आणि तो वाऱ्यासारखा सोशल मीडियावर व्हायरल झाला. येत्या व्हिज्जी मुंबईचा संघ – हार्दिक तामोरे (कर्णधार), श्रुजन आठवले, रुद्रा धांडे, चिन्मय सुतार, आशय सरदेसाई, साईराज पाटील, ओंकार जाधव, सत्यलक्ष जैन, मिनाद मांजरेकर, अर्जुन तेंडुलकर, अमन शेरॉन, अथर्व पूजारी, मॅक्सवेल स्वामिनाथन, प्रशांत सोळंकी, विघ्नेष सोळंकी खेळणार आहेत.