


पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पारोळा शहरात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. भाजपा कामगार आघाडी (जळगाव जिल्हा पश्चिम) व ध्वजा लोकआधार प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, १९ सप्टेंबर रोजी श्री मोठे राम मंदिर, राम चौक येथे सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत महाशिबिर आयोजित करण्यात आले आहे.
शिबिरात घरेलू कामगार व असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंदणी करून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच मोफत नेत्र तपासणी व गरजू रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
यावेळी कामगारांच्या विविध समस्या, शासकीय योजना आणि हक्कांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विशेष कामगार हेल्पलाईनचे अनावरण करण्यात येणार आहे. गरीब, वंचित, कष्टकरी महिला, घरेलू कामगार आणि गरजू नागरिकांनी महाशिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपा कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश पाटील यांनी केले आहे.



