Home Cities जळगाव राष्ट्रीय लोक अदालतीत अपघातातील दाव्यांमध्ये लाखो रुपयांची तडजोड ; दोन तक्रारदारांना तब्बल...

राष्ट्रीय लोक अदालतीत अपघातातील दाव्यांमध्ये लाखो रुपयांची तडजोड ; दोन तक्रारदारांना तब्बल २४ लाख ७० हजार तर एका प्रकरणात १९ लाखांची भरपाई मंजूर!

0
21


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्हा व सत्र न्यायालयात आज आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये (National Lok Adalat) अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध प्रकरणांमध्ये तडजोड घडवून आणत पक्षकारांना मोठा दिलासा देण्यात आला. या लोक अदालतीमध्ये विशेषतः रस्ते अपघातातील नुकसान भरपाईच्या दाव्यांमध्ये मोठे यश मिळाले असून, अपघातातील दोन वेगवेगळ्या तक्रारदारांना एकूण २४ लाख ७० हजार रुपयांची तडजोड रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

लोक अदालतीच्या पॅनेलसमोर पार पडलेल्या या सुनावणीदरम्यान अपघातग्रस्त पीडित कुटुंबांना त्वरित व न्याय्य मोबदला मिळवून देण्यासाठी दोन्ही बाजूंच्या विधिज्ञांनी सकारात्मक भूमिका घेतली. २४ लाख ७० हजार रुपयांची तडजोड मंजूर झालेल्या या महत्त्वपूर्ण प्रकरणात तक्रारदारांच्या वतीने ॲडव्होकेट श्रेयश चौधरी आणि ॲडव्होकेट महेंद्र सोमा चौधरी यांनी अत्यंत प्रभावीपणे कामकाज पाहिले. त्यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे आणि कायदेशीर युक्तिवादामुळे पीडित पक्षाला मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

तसेच, दुसऱ्या एका गंभीर अपघात प्रकरणात तक्रारदाराने न्यायालयात दाखल केलेल्या तब्बल ३० लाख रुपयांच्या दाव्यामध्ये देखील आजच्या लोक अदालतीत तडजोडीचा मार्ग निघाला. संबंधित विमा कंपनी आणि सरकारतर्फे आपसी तडजोड घडवून आणत तक्रारदाराला १९ लाख रुपयांची भरपाई देण्यावर एकमत झाले आणि तसा आदेश पारित करण्यात आला. या प्रकरणात तक्रारदाराच्या वतीने ॲडव्होकेट नितीन देशमुख यांनी तर विमा कंपनीच्या वतीने ॲडव्होकेट अनुप देशमुख यांनी कामकाज पाहून तडजोड यशस्वी केली.


Protected Content

Play sound