जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात आगामी काळातील सण, भारताचा स्वातंत्र्य दिन तसेच जळगाव महानगर पालिकेतर्फे महामार्गालगतचे अतिक्रमण काढण्याची मोहिम इत्यादि बाबीं लक्षात घेता जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी 19 ऑगस्टपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.
आगामी काळातील श्रावणमास, नागपंचमी, बकरी ईद, नारळी पौर्णिमा, भारताचा स्वातंत्र्य दिन तसेच जळगाव महानगर पालिकेतर्फे महामार्गालगतचे अतिक्रमण काढण्याची मोहिम इत्यादि बाबीं लक्षात घेता जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी संपूर्ण जिल्हा हद्दीत दिनांक 19 ऑगस्ट, 2019 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकमलम (3) अन्वये पाच किंवा अधिक लोकांचा जमाव करण्यांस बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचा आदेश जारी करण्यात आल्याची माहिती अपर जिल्हादंडाधिकारी, जळगाव वामन कदम यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.